उपवासाला लोक अनेकदा शेंगदाणे, साबुदाणे, कुट्टुचे पीठ,मखाणे आणि साखर वापरतात. आपण देखील ह्या गोष्टींना वापरत असाल तर हे लहान -लहान टिप्स आपल्या कामी येतील. चला तर मग जाणून घेऊ या.
टिप्स-
1 साबुदाणा भिजत घालताना हे करा-
उपवासात जास्त पदार्थ साबुदाण्याने बनतात. या पासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. कारण या पासून बनलेले पदार्थ चविष्ट असतात आणि चटकन बनतात.
2 शेंगदाणे तळून न घेता भाजून घ्या-
उपवासाचे बरेच पदार्थ बनविण्यात शेंगदाणे वापरतात.शेंगदाण्याचा वापर करताना जास्त तळले जातात.ही पद्धत चुकीची आहे.असं न करता शेंगदाणे तव्यावर किंवा कढईत भाजून घ्या. तेल न वापरता हलकं सोनेरी किंवा तपकिरी होई पर्यंत भाजून घ्या. असं केल्याने साबुदाण्याच्या खिचडीत,वडे किंवा इतर पदार्थांमध्ये तेल कमी लागेल.
3 शिंगाड्याचे पीठ अशा प्रकारे मळून घ्या -
शिंगाड्याच्या पिठाला सामान्य पिठाप्रमाणे मळू नका. कारण हे पीठ कॉर्नफ्लोअर सारखे असते. या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त पडल्यावर हे मळून घ्यायला खूप त्रास होऊ शकतो. या त्रासा पासून वाचण्यासाठी कणीक मळताना थोडंसं तेल घाला आणि लागत-लागत पाणी घालून कणीक मळावी.