हरे रामा हरे कृष्णा

ShrutiWD
हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा- हरे कृष्णा....कृष्णधूनेमध्ये मग्न भाविक आणि सर्वत्र कृष्णाच्या नावाचा जप...गळ्यात तुळशीची माळ घालून भगवंतचरणी लीन झालेले हे भाविक नाचत गात प्रभूची भक्ती करत असतात... हा सारा माहौल असतो इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शस अर्थात इस्कॉन मंदिराचा. कृष्णभक्तीत लीन झालेल्या भाविकांच्या या आंतरराष्ट्रीय सोसायटीची स्थापना स्वामी प्रभूपाद यांनी केली.

कोलकता येथील भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी यांना भेटल्यानंतर प्रभूपादजी कृष्णभक्तीत पूर्णपणे लीन झाले. गुरूने शिष्याला सांगितले, बेटा तू युवा आहेस. तेजस्वी आहेस. तुला आपल्या धर्माच्या पवित्र संस्कारांचा विदेशात प्रचार आणि प्रसार करायला हवा. गुरूच्या आदेशाचे पालन करण्यासाठी स्वामी प्रभूपाद महाराज यांनी ५९ व्या वर्षी संन्यास घेतला. गुरूआज्ञेच्या पूर्ततेसाठी ते प्रयत्न करू लागले. त्यांनी कृष्णभवनामृत संघाची स्थापना न्यूयॉर्क येथे केली.

न्यूयॉर्क येथील सुरू झालेली कृष्ण भक्तीची गंगा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. अनेक मंदिरांमध्ये कृष्णधून ऐकू येऊ लागली.

जगभरात इस्कॉन चळवळीचा प्रसार होण्याचे कारण या मंदिरांमध्ये मिळणारी असीम शांतता आहे. विशेषतः पाश्चात्य जगतात कृष्णभक्तीचे तर वेड लागले आहे. कृष्णाने गीतेत मांडलेल्या जीवनविषयक तत्वज्ञानाने पाश्चात्यांनाही प्रभावित केले आहे. या चळवळीच्या भक्तांना केवळ चार नियमांचे पालन करावे लागते.

. तामसी भोजनाचा त्याग करावा लागतो. (कांदा, लसूण, मास, मद्य यापासून दूर रहावे लागेल.)

. अनैतिक वर्तणूकीपासून दूर रहावे लागेल. (जुगार, ब, वेश्यागृह अशा अनैतिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे.)

. एक तास शास्त्राध्ययन करावे लागेल. ( यात गीता, भारतीय धर्म-इतिहासाशी निगडीत शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो.)

. हरे कृष्णा- हरे कृष्णा अशा नामस्मरणाची माळा सोळा वेळा जपावी लागेल.

ShrutiWD
या नियमांचे पालन करून कृष्णभक्तीमार्गाची कास धरणार्‍या भक्तांची संख्या वाढत चालली आहे. कृष्णाप्रती लीन होणार्‍या प्रत्येक भाविकाचे येथे स्वागत केले जाते. स्वामी प्रभूपादजींच्या अथक प्रयत्नांमुळेच सुरवातीच्या दहा वर्षांतच जगभरात या सोसायटीची १०८ मंदिरे बांधली गेली. आता तर ही संख्या चारशेहून अधिक मंदिरांपर्यंत आहे. धर्मयात्रेत या आठवड्यात आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय भगवान कृष्णाचे शिक्षण झालेल्या उज्जैन या गावी.

इस्कॉनतर्फे येथे २००६ मध्ये शुभ्र संगमरवरात मंदिर बांधण्यात आले. मंदिर भव्य आहे. राधा-कृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती येथे आहे. या मंदिराच्या रचनेचे निर्माते असलेल्या गुरूंची छान मूर्ती आहे. प्रत्येक इस्कॉन मंदिराप्रमाणे येथेही छानशी बाग आहे. त्यातूनच तुळशीची माळ बनवली जाते.

मंदिराचीच मोठी धर्मशाळा आहे. येथे दहा
ShrutiWD
हजाराची वर्गणी भरल्यानंतर इस्कॉनच्या जगभरातील कोणत्याही मंदिरात वर्षातून एकदा दोन दिवस थांबण्याची सोय होऊ शकते. शिवाय अनुयायांना सात्विक भोजनही दिले जाते. या सर्व मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांची रचना एकसारखी आहे. त्यामुळे त्यात एक आपलेपणा जाणवतो. त्यामुळेच इस्कॉनप्रती देशभर आणि जगात आपुलकी आणि श्रद्धा आहे.

फोटोगॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा...

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा