लग्न करुन सुखी संसार करत असलेल्या जोडप्यांकडून समाजाला एकच अपेक्षा असते की पाळणा कधी हालणार? तिसर्याचं स्वागत करायचं म्हणजे कुटुंबात आनंद तर पसरतोच पण धुक-धुक देखील लागते कसे होणार. कारण बाळा आल्यावर जोडप्यांच जगच बदलून जातं. याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम समोर येतात. म्हणून प्लानिंग करण्यापूर्वी नीट विचार करा.
आई-बाबा बनणं हा आनंदाचा क्षण असतो पण सोबतच जबाबदारी ही वाढते. रोमांससाठी वेळ मिळत नाही तर साथीदाराची चिडचिड देखील होऊ शकते. कारण संपूर्ण वेळ हा आता बाळाचा असतो. अशात फिरायला जाणे, हॉटेलिंग करणे हे सर्व अवघड होऊ लागतो.