यावरून जाणून घ्या बायकोला आपल्यात रस नाही

काय आजही आपल्याशी गप्पा मारताना बायकोच्या डोळ्यात ती चमक दिसून येते जी आधी होते? सकाळी उठल्यावर ती हसून आपल्या गुड मॉर्निंग म्हटते? आपण बाहेरून येण्याची आतुरतेने वाट बघते? जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आपलं नातं सुरक्षित आहे परंतू यावर आपण स्पष्ट नसाल तर जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्या रस नाही हे कळून येईल.
आता ती बोलत नाही
हेल्थी नातं तेव्हाचं निर्मित होतं जेव्हा आपण एकमेकाशी मोकळेपणाने बोलतो. जर आपली बायको दिवसभर काय करते, कुणाशी बोलते, ऑफिसमध्ये कश्या प्रकारे वागते हे सर्व सांगत नसेल तर सावध व्हा. आपल्यातला संवाद केवळ सूचना प्रदान करण्यापुरता राहिला असेल तर वेळेवारी सावध होण्याची गरज आहे.
 
ती नेहमी स्वत:ला व्यस्त ठेवते
ती स्वत:मध्ये बुडालेली असते. स्वत: वेगवेगळ्या कारणांमुळे व्यस्त असते किंवा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत असते. अशात तिला दोघांच्या नात्याची गरज नाही असे जाणवू लागतं.
 
ती अपमानित करते
मत जुळत नसले तरी एकमेकाचा अपमान करणे योग्य नव्हे. प्रेमात सन्मान देणे गरजेचे आहे. जर ती निरंतर आपल्या अपमानित करत असेल, टोमणे मारत असेल तर ही वेळ धोक्याची आहे.

महत्त्वाच्या गोष्टी सांगत नाही
स्वत:साठी काही योजना आखत असताना किंवा स्वत:बद्दल निर्णय घेताना त्यात ती आपल्याला सामील करत नाही अर्थात आपल्याकडे दुर्लक्ष करते याचा अर्थ ती आपल्याला काहीच महत्त्व देत नाही.
 
दुर्लक्ष करते
आपल्या वागणुकीकडे, तब्येतीकडे, आपल्या दिनचर्येकडे ती दुर्लक्ष करते किंवा कोणत्याही बाबतीत ती रीऍक्ट करत नसेल किंवा तिला आपल्या नातेवाइकांशी आणि मित्रांशी कुठलेही संबंध ठेवायची इच्छा नसल्यास जाणून घ्या की आपल्यात प्रेम उरलेलं नाही.
 
दुसर्‍यांना चांगली वागणूक देते
आपल्याकडे दुर्लक्ष करून ती इतर लोकांना चांगली वागणूक देते याचा अर्थ तिला आपल्यात रस नाही.
 
स्पेशल डे ही सामान्य
आपला वाढदिवस, लग्नाची वर्षगाठ, आणि इतर काही स्पेशल दिवसही ती खूश नसते. सेलिब्रेट करण्याच्या मूड मध्ये नसून तो दिवस सामान्य दिवसाप्रमाणे घालवू बघते याचा अर्थ उशीर होतोय. सावध व्हा.
 
हे संकेत मिळत असल्यास वेळेवारी सावध होऊन पुन्हा आपले नाते मजबूत करण्याची संधी शोधावी.

वेबदुनिया वर वाचा