किचन कॅबिनेटमध्ये असे अनेक मसाले असतात जे जेवणाची चव वाढवण्यासोबत किचनच्या इतर कामांमध्ये देखील मदत करतात, त्यामधीलच एक आहे लवंग. लवंगचा उपयोग महिला नेहमी जेवणाची चव वाढवण्यासाठी करता. पण याशिवाय लवंग अनेक कामांमध्ये उपयोगी आहे. तर चला जाणून घेऊ या लवंगचे इतर फायदे कोणते.
किडे दूर राहतात-
स्वयंपाक घरात नेहमी किडे निर्माण होतात, तसेच अनेक जणांच्या किचनमध्ये छोटे छोटे झुरळ येतात. अनेक वेळेस साखरेला देखील मुंग्या होतात. पीठ आणि तांदळाच्या डब्यामध्ये जाळे तयार होतात. या सर्व समस्या दूर ठेवण्यासाठी लवंग मदत करते. चहा पावडर आणि साखरमध्ये 3-4 लवंग टाकून स्टोर करावे. यामुळे मुंग्या लागत नाही.
जेवणाची चव वाढवते-
लवंगाच्या सिरप बद्दल कदाचित तुम्ही ऐकले नसेल. पण याचा उपयोग तुम्ही डेजर्ट मध्ये करू शकतात. आइसक्रीम, डेजर्ट्स आणि कॉकटेलमध्ये लवंग सिरपचा उपयोग केल्यास चव वाढते. पाणी, साखर, लवंग उकळून घ्यावी. मगयाचा पाक तयार होईल. आता हे थंड करून याचा उपयोग तुम्ही करू शकतात.