भारतीय स्वयंपाघरात तूप हे वापरले जाते. पोळी किंवा भाजी, वरण-भात, सर्वानवर तूप टाकतात. तूप फक्त चविष्टच नसते तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तर चला आज आम्ही तुम्हाला कमीतकमी मलाईपासून जास्तीतजास्त तूप कसे काढावे हे सांगणार आहोत.
तूप करण्यापूर्वी या गोष्टींकडे ठेवावे लक्ष-
रात्रीच्या मलाईमध्ये दही घालावे. सकाळ पर्यंत मलाई पूर्णपणे जमून जाईल. आता तुम्ही तूप बनवण्यासाठी तयार आहात, अनेक महिला खूप मलाई अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवतात यामुळे तिला वास यायला लागतो तर असे न करता रात्रीच ताजी मलाई दही मध्ये मिक्स करावी.
तसेच आता मदतीला बर्फ घ्यावा. बर्फाच्या मदतीने तुम्ही मलाईमधून खुपसारे तूप काढू शकाल. रात्री जमवलेल्या मलाईला मिक्सरमध्ये घालावे. त्यामध्ये बर्फाचे पाणी मिक्स करत जा. तुम्ही पाहाल की लोणी निघण्यास सुरवात होईल. या लोणीमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालावे. यामुळे लोणीचे प्रमाण वाढेल. ही टीप खासकरून उन्हाळ्यात महत्वाची आहे.