दुधी भोपळ्याचा शिरा बनवताना त्यात मलई घालून परतून घ्या. चांगली चव येईल.
दही बडे करताना वाटलेल्या उडीद च्या डाळी मध्ये दही मिसळून फेणून घ्या. दही बडे चविष्ट आणि मऊ बनतात.
* कचोडी मऊ करण्यासाठी मैद्यात दही मिसळून मळून घ्या.
* दही जमविताना दुधात नारळाचा तुकडा घातल्यावर दही दोन ते तीन दिवस ताजे राहते.
* पेपर डोसा कुरकुरीत हवा असल्यास पिठात 2 चमचे मक्याचे पीठ मिसळा.
* साजूक तूप जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये 1 तुकडा गूळ आणि एक तुकडा सैंधव मीठ घाला.