10 सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स

मंगळवार, 26 जानेवारी 2021 (12:45 IST)
स्वयंपाकाला सोपे करण्यासाठी आम्ही सांगत असलेल्या या 10 उपयुक्त अश्या टिप्स वापरून बघा आणि आपल्या दररोजच्या जेवण्याला एक नवीन चव द्या.
 
सर्वोत्तम किचन टिप्स -
 
1 वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर शिजवावे, या मुळे रंग आणि चव चांगली येते.
 
2 ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी त्यात थोडी साखर मिसळा.
 
3 टोमॅटो मिळत नसल्यास ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो केचप किंवा सॉस वापरू शकता.
 
4 खीर बनविण्यासाठी नेहमी जड भांड्याचा वापर करावा, जेणेकरून दूध लागत नये.
 
5 जर मसाल्यात दही मिसळायचे असल्यास, त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या आणि हळू-हळू मसाल्यात मिसळा.
 
6 भाज्या चिरण्यासाठी नेहमीच लाकडाच्या चापिंग बोर्डचा वापर करावा. संगेमरमरी स्लॅब वर चिरल्याने सुरीची धार कमी होते.
 
7 शक्य असल्यास भाज्यांचे जास्तीत जास्त पातळ साल काढण्याचा प्रयत्न करा.
 
8 घरात तयार केलेल्या आलं,लसूण आणि हिरव्या मिरच्यांच्या पेस्ट ला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ घाला.
 
9 पुन्हा-पुन्हा अन्न गरम करू नका, या मुळे त्यात असलेले पौष्टीक घटक नाहीसे होतात. 
 
10 ग्रेव्ही साठी नेहमीच पिकलेले लाल टमाटे वापरा, यामुळे रंग देखील छान येतो. 
 
या टिप्स देखील उपयुक्त आहेत -
 
* फ्रिज मध्ये वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा.
 
* कपातून चहा किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणता ही प्रकारचा सोडा भरून 3 तास तसेच ठेवा.
 
* हिरव्या मिरच्या चिरल्यावर होणारी जळजळ पासून वाचण्यासाठी बोटांना साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवा.
 
* चीझ किसल्यानंतर किसणीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, या मुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीझ स्वच्छ होईल. 
 
* लादीवर अंड पडल्यास, त्यावर मीठ भुरभुरून काही वेळ तसेच ठेवा. मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा, अंड सहजपणे स्वच्छ होणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती