करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स

सोमवार, 25 जानेवारी 2021 (08:53 IST)
जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब होतं आणि अशात ते पदार्थ फसण्याऐवजी भांड स्वच्छ करणं कठीण जातं. त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत जाणून घ्या-
 
असं झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काहीवेळ घालून ठेवा. त्यानंतर भांड स्वच्छ करा.
 
भांड्यात पाणी आणि मीठ टाकून उकळून घ्या. नंतर घासून घ्या.
 
भांड्यात पाणी आणि कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळी घ्या. काही वेळातच करपलेले तुकडे निघून येतील.
 
भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे लिंबाचा रस आणि २ कप गरम पाणी टाका. मग काथ्याने भांड स्वच्छ करा.
 
करपलेल्या भांड्यात एक कच्चा लिंबू घेऊन रगडा. त्यानंतर गरम पाणी टाकून ठेवा. काही वेळानंतर स्वच्छ करुन घ्या.
 
भांड्यात अमोनिया आणि पाणी टाकून उकळवा. गरम झाल्यानंतर घासून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती