कुरकुरीत भजी व्हावी यासाठी त्यात हे घाला

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:07 IST)
भजी करताना घोळमध्ये चिमूटभर अरारोट आणि जरा गरम तेल टाकलं तर भजी कुरकुरीत होतात.
पराठेसाठी कणिक मळताना त्यात उकळेला बटाट कुस्कुरुन घालत्यास पराठे टेस्टी बनतात.
बटाटेचे पराठे करताना यात कसूरी मेथी घातल्याने स्वाद वाढेल.
ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी यात सातू घालू शकता.
रायतामध्ये हींग-जीरा भाजून घातल्यापेक्षा त्याला फोडणी दिली तर स्वाद वाढतो.
राजमा किंवा उडीद डाळ शिजवताना त्यात मीठ घालू नये, लवकर शिजेल.
फुलकोबीचा रंग तसाच राहावा यासाठी भाजी करताना त्यात एक चमचा दूध किवा व्हिनेगर घालावं.
भेंडी चिरताना चाकूला लिंबाचा रस लावावा याने भेंडी चिटकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती