एकदा बादशहा अकबर आणि बिरबल हे बागेत फिरत असताना गंभीर चर्चा करत होते तेवढ्यात बादशहाला बिरबलाची परीक्षा घेण्याचा विचार आला. एकाएकी बादशहाचे लक्ष एका लाकडाकडे गेले आणि त्यांनी बिरबलाला विचारले, " बिरबल हे सांगा की समोर पडलेले लाकूड, न कापता लहान करू शकतोस? ते लाकूड बिरबलाच्या हातात देऊन म्हणाले, " होय बादशहा मी हे लाकूड लहान करू शकतो. "