चवीनुसार मीठ
कृती-
सर्वात आधी कोळंबी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून सोलून घ्या. आता चांगल्याप्रकारे स्वच्छ करून एक पातेलीत ठेवा. आता त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, लिंबाचा रस, व्हिनेगर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता हे वीस मिनिटांकरिता असेच राहू दयावे. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून परतवून घ्यावे. आता कांदा आणि तिखट घालून परतवावे. आता टोमॅटो घालावा. तसेच कढीपत्ता घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये कोळंबी टाकावे. कोळंबी मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली कोळंबी फ्राय रेसिपी, भात किंवा पराठे सोबत गरम नक्कीच सर्व्ह करा.