Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न

रविवार, 15 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
450 ग्रॅम चिकन
एका चमचा आले लसूण पेस्ट
एक टीस्पून व्हिनेगर
एक कप मैदा
एक टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
एक टीस्पून तिखट 
एक टीस्पून कांदा पावडर
एक टीस्पून लसूण पावडर
एक टीस्पून मिरे पूड 
एक टीस्पून ओरेगॅनो
एक टीस्पून मीठ
एक टीस्पून पांढरी मिरे पूड 
एक टीस्पून साखर
चिमूटभर बेकिंग सोडा
½ टीस्पून अजिनोमोटो
तेल 
पाणी   
 
कृती-
सर्वात आधी पॉपकॉर्नकरीतमसाला तयार करावा. यासाठी मिक्सर भांड्यामध्ये काश्मिरी तिखट, तिखट, कांदा पावडर, लसूण पावडर, काळी मिरी, ओरेगॅनो, मीठ, पांढरी मिरी पावडर, साखर, चिमूटभर बेकिंग सोडा आणि अजिनोमोटो टाकून मिक्सरमधून काढून मिक्स मसाला तयार करा. यानंतर  बोनलेस चिकन ब्रेस्टचे तुकडे करणे अगदी घरीही सोपे आहे. तसेच आता या तुकड्यांमध्ये आले आणि लसूण पेस्ट, व्हिनेगर आणि 2 चमचे तयार मसाला घालावा आणि  झाकण ठेवून 1 तास मॅरीनेट करावे. यानंतर एका प्लेटमध्ये पीठ घ्यावे. त्यात पुन्हा 2 टेबलस्पून मसाला घालवा. व चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता एका   भांड्यात थंडगार पाणी काढून त्यात बर्फाचे तुकडे घालावे. प्रथम मॅरीनेट केलेले चिकन पिठात चांगले मिक्स करून ठेवा आणि नंतर थंडगार पाण्यात बुडवून बाहेर काढा. ते पुन्हा पिठात घालून चांगले मिसळावे. आता कढईत तेल टाकून गरम झाल्यावर चिकनचे तुकडे एक एक करून टाका आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टाळून घ्यावे. एका प्लेटमध्ये चिकन पॉपकॉर्न काढा आणि वर मसाला घालून मिक्स करा. तर चला तयार आहे आपले सॉस किंवा चटणी सोबत याचा आस्वाद घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती