कोथिंबीर- दोन चमचे
पुदिना - दोन चमचे चिरलेला
दालचिनी, वेलची, लवंगा, कढीपत्ता
चवीनुसार मीठ
कृती-
यखनी चिकन पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवावे. आता एका मोठ्या भांड्यात चिकन, पाणी, 1 दालचिनीची काडी, 2-3 वेलची, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र घालावे.व चिकन शिजवण्यासाठी सुमारे 15-20 मिनिटे लागतील मऊ चिकन शिजल्यावर ते गाळून घ्या आणि सूप वेगळे करा. आता कढईत तेल किंवा तूप घालून गरम करावे. त्यात जिरे, दालचिनी, लवंगा, वेलची आणि कढीपत्ता घाला आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घालावा. नंतर त्यात लसूण-आले पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात उकडलेले चिकन टाका आणि दही घालून मसाल्याबरोबर 5 मिनिटे शिजू द्या. म्हणजे चिकन मसाल्याबरोबर चांगले मिक्स होईल.आता बासमती तांदूळ एका वेगळ्या भांड्यात धुवावा आणि 20 मिनिटे भिजत ठेवावा. नंतर हा तांदूळ एका पातेल्यात घालून त्यात तयार केलेला यखनी घालून भात शिजण्यासाठी त्यात याखनीप्रमाणे पाणी घालून झाकून ठेवावे. भात अर्धा शिजल्यावर मध्यम आचेवर आणखी 10-15 मिनिटे शिजू द्या. कोथिंबीर आणि पुदिना घालावाम्हणजे पुलावची चव आणि सुगंध वाढेल. तर चला तयार आहे आपला यखनी चिकन पुलाव, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात.