Steamed Kabab स्टीम कबाब

साहित्य: मीट 400 ग्रा, आलं-लसूण-मिरची पेस्ट 2 चमचे, 1 वाटलेला कांदा, दही 1 चमचा, कांद्याची पात अर्धा वाटी, पालक अर्धा वाटी, जिरं पावडर, कोथिंबीर, तिखट, पीपर, मीठ, तेल, ब्रेड स्लाइस 1 दुधात भिजवून पिळलेली.
 
कृती: मीट, आलं-लसूण-मिरची पेस्ट, कांदा, भाज्या आणि जिरं पावडर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. जास्त बारीक पिसू नका. एका बाऊलमध्ये काढून त्यात तेल सोडून इतर साहित्य टाकून मिक्स करून घ्या. आता हातावर तेल लावून तयार मिश्रणाने गोळे तयार करून नंतर कबाबचा आकार द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून शॅलो फ्राय करा नंतर स्टीमरमध्ये झाकून 15 मिनिटापर्यंत वाफवून घ्या. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती