अंड्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वात एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल किंवा तूप घालून मिक्स करावे.आता त्यात पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यावे. आता पीठ ओल्या कापडाने झाकून 10 मिनिटे ठेवावे. आता एका प्लेटमध्ये दोन बटाटे मॅश करावे. त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे. तसेच आता एका वाडग्यात किंवा ग्लासमध्ये अंडे फोडून चांगले फेटून घ्यावे. मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे करावे. एक गोळा लाटून त्याचा पुरीचा आकार बनवा. त्यात बटाट्याचे तुकडे भरून पातळ पराठ्यात लाटून घ्यावे आणि त्यात तूप घालावे. आता तव्यावर पराठा घालून वर येऊ द्या. पराठा थोडा वर येताच तो फोडून त्यात फेटलेले अंडे घालावे. दोन्ही बाजूंनी तूप लावून पराठा बेक करावा. त्याचप्रमाणे उरलेले पराठेही बनवा. तर चला तयार आहे आपला अंड्याचा पराठा रेसिपी, पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.