१ - अगं बाई, प्रमोशन बिमोशन झालं की काय?
२ - नाही गं, कसलं आलंय प्रमोशन, ते काहीतरी अवार्ड मिळालं म्हणे कंपनीला, नाव विसरले बघ, असो.. तर हे म्हणाले आज दुपारचा डबा नको..
१ - अगं बाई, म्हणजे सकाळचा वेगळा डबा नेतात की काय?
२ - चल, काहीही तुझं, पुढं ऐक, मग मी म्हटले बरं झालं आधी सांगितलं.. काम वाचलं माझं. नाहीतर आपण सकाळी उठून सगळं करायचो आणि हे ऐनवेळी डबा नको म्हणतात.. शिवाय यांच्या भाज्या ठरलेल्या बटाटा, मेथी, शेपू, बेसन, मटकी. जरासं वेगळं काही करायचं म्हटलं की यांचं तोंड कारल्याहून वाकडं
२ - हो ना, जीव दमून जातो नुस्ता. आमच्या ह्यांनाही गवार आवडत नाही ना, म्हणून मग मी आज केली डब्याला. अशीही पडून राहते आणि भाज्या किती महाग झाल्यात, त्याचं काय पडलंय कुणाला
१ अगं काल रात्री आवरायला खूप वेळ गेला, झोपायलाही उशीर झाला आणि नेमकं आजच आमच्या सासूबाईंना जायचं होतं बाहेर सक्काळी सक्काळीच, म्हणून जरा जास्त लवकर उठावं लागलं.. त्यात लाईटही गेले, सगळं पाणी गॅसवर ठेवावं लागलं, पोरांनाही उशीर झाला नेमका स्कुलला