Bollywood News: 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा अभिनेता विक्रांत मॅसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने एका भावनिक पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. 12वी फेलमध्ये आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा अभिनेता विक्रांत मॅसीने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे आणि त्यानंतर असे समोर आले की अभिनेता चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेत आहे? यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे की, विक्रांतने हा मोठा निर्णय का घेतला? विक्रांतने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांनाही आश्चर्यचकित करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत मॅसी यांनी 1 डिसेंबर रोजी एक पोस्ट टाकली. अभिनेत्याने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. विक्रांतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले, “नमस्कार, गेली काही वर्षे आणि तेव्हापासूनचा काळ खूप छान होता. तुमच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, पण जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला हे जाणवत आहे की माझ्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. पती, वडील आणि मुलगा आणि आता अभिनेता म्हणूनही. 2025 मध्ये आम्ही एकमेकांना शेवटच्या वेळी भेटू, शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद. या दरम्यान घडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन.” अभिनेत्याने हात जोडलेले इमोजी देखील पोस्ट केले. विक्रांतसाठी चाहते भावूक होत आहे.
विक्रांत मॅसीने अचानक असा इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहे. यामागचे कारण कोणालाच समजलेले नाही. विक्रांत मॅसीने वयाच्या 37 व्या वर्षी अभिनयाला अलविदा का केला हे सर्वजण म्हणत आहे. तसेच काही चाहत्यांचे म्हणणे आहे की विक्रांत हे करू शकत नाही, काहीतरी वेगळे चालले असेल.