व्हायरल ताप असेल तर घशात वेदना,डोके दुखी,डोळे लाल होणं,कपाळ तापणे,खोकला,थकवा,उलटी,आणि अतिसार सारखे लक्षणे दिसतात. हे संसर्गजन्य आहे. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो. या पासून बचाव साठी काही घरगुती उपचार आहे. चला जाणून घेऊ या.
1 हळद आणि सुंठ पूड-
सुंठ म्हणजे आल्याची पूड,आल्यात तापाला बरे करणारे गुणधर्म आढळतात. या साठी एक चमचा हळद,एक चमचा सुंठपूड,आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या. या मुळे व्हायरल ताप नाहीसा होतो.