पॅन कार्डाला आधार कार्डशी लिंक कसे करावे जाणून घ्या

मंगळवार, 16 मार्च 2021 (19:32 IST)
भारतात आयकर जमा करण्यासाठी किंवा बँकिंग सेवा मिळविण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे . तसेच पॅन कार्ड देखील हे अनिवार्य केले आहेत. पैशांच्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी  भारत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक  करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या. 
 
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया -
 
1 सर्व प्रथम, आपल्याला ई-फाइलिंग https://incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळावर जावे लागणार.आणि काही निर्देशाचे पालन करावे लागतील.
 
2 या संकेत स्थळावर Register Here चे पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करायचे आहे. इथे आपल्याला पॅन कार्डाची माहिती द्यावी लागेल. या नंतर एक ओटीपी आपल्या अधिकृत मोबाईलवर येईल तो ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.त्या नंतर एक पासवर्ड बनवून त्या पासवर्ड ने लॉगिन करावे लागेल.अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करू शकता.आपण पूर्वीपासून रजिस्ट्रेशन केले असतील तर आपल्याला केवळ लॉगिन करायचे आहे.  
 
3 लॉगिन करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करावयाचा आहे. या नंतर पासवर्ड द्यावे लागणार. खाली कप्टचा कोड देऊन लॉगिन वर क्लिक करा. 
 
4 लॉगिन केल्यावर एक पॉपअप विंडो येईल या मध्ये आधार नंबर लिंक करायचे सांगितले जाईल.आपण क्लिक करता तर आपल्याला आधार नंबर प्रविष्ट करायला सांगितले जाईल आधार नंबर दिल्यावर एक केप्टचा कोड दिला जाईल जो आपल्याला एक निर्दिष्ट ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. या नंतर  Link now  वर क्लिक करायचे आहे. 
 
5 जर आपल्या समोर पॉपअप विंडो आली नाही तर टॉप मेनू मध्ये जाऊन profile setting ऑप्शन वर जाऊन link adhar पर्याय ची निवड करू शकता. 
 
6 आधार नंबर प्रविष्ट केल्यावर save वर क्लिक करा.
अशा प्रकारे आपण आधार कार्ड आणि पॅन कार्डाला लिंक करू शकता. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती