पेरूची पाने देखील कामाची असतात, नक्की वाचा याचे फायदे

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (10:32 IST)
पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो. तसे, तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसी मध्ये ह्याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात. पेरू प्रमाणेच त्याची पाने ही देखील खूप उपयुक्त असतात. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बेक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेन्टरी गुणधर्म असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊ या पेरूच्या पानाचे फायदे. 
 
* पोट दुखी आणि उलट्या मध्ये देखील आराम देतात - 
पेरूच्या पानात अँटी बेक्टेरियल गुणधर्म असतात, अशा मध्ये त्याच्या पाण्याच्या सेवन केल्याने आपल्या पोटाचे दुखणे दूर होऊ शकतात. तसेच हे आपल्याला उलट्यांपासून देखील आराम देतात. या साठी आपण पेरूच्या 5 -6 पानांना 10 मिनिटे उकळवून घ्या आणि नंतर गाळून त्याचे पाणी प्या.
 
* सांधे दुखीचा त्रास दूर करतो - 
सांधे दुखी मध्ये देखील पेरूची पाने फायदेशीर आहे. या साठी आपण पेरूची पाने वाटून त्याचे लेप बनवा आणि त्या लेपाला सांध्यांवर लावावे, या मुळे आपल्याला वेदनेपासून आराम मिळेल.
 
* मधुमेहात देखील फायदेशीर- 
पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जातात. वास्तविक हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं. या शिवाय हे शरीरातील जटिल स्टार्च साखरे मध्ये बदलण्यापासून रोखत, ज्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतं.
 
* दाताच्या दुखण्यापासून आणि हिरड्यांची सूज कमी करतं- 
पेरूच्या पानाचे पाणी दात दुखणं, हिरड्यांची सूज आणि तोंडाच्या छाला पासून आराम देण्याचे काम करतं. आपण याचे पाने उकळवून त्याचा पाण्याने गुळणे करा. असे केल्यास आपल्याला खूप आराम मिळेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती