पोटदुखीवर घरगुती उपचार

NDND
कधी-कधी अवेळी जेवण झाल्याने पोट दुखते. लहान मुले व वयस्करांना पोटदुखीचा त्रास जास्त होत असतो. पोट दुखत असेल तर घरगुती उपचार सोडून औषधी गोळ्या घेतो. परंतु, त्याने तात्पुरता आराम मिळतो व पुन्हा जैसे थे अवस्था होते. घरगुती उपाचाराने पोटदुखी तर दूर होऊन पचनक्रियाही सुरळीत होत असते.

घरगुती उपाय-
दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.

अपचन, संडास न होणे, पोटात गॅस होणे अशा विविध कारणामुळे पोट दुखत असेल तर खालील घरगुती उपचार उपयोगी पडतील.

साहित्य- करंजीच्या बिया 50 ग्रॅम, हींग 10 ग्रॅम, शंख भस्म 10 ग्रॅम व गुळ 50 ग्रॅम.

सगळ्यात करंजीच्या बिया फोडून त्यातील मगज बारीक करून त्याचे चूर्ण करून घ्या. त्यानंतर त्यात हिंग व शंख भस्म मिसळून एक जीव करून घ्या. गुळाची बारीक चिरून न त्यात चूर्ण टाकून घट्ट झालेल्या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या तयार करा. तयार झालेल्या गोळ्या सावलीत वाळत घाला. 2-2 गोळ्या सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखी दूर होते. या गोळ्याचा डोके दुखी, सर्दी, खोकला आदी व्याधी वरही लाभदायी आहेत. या गोळ्या घरीच तयार करता येतात. तसेच बाजारात 'उदर शूल हर वटी' नावाने प्रत्येक आयुर्वेदीक मेडिकलमध्ये उपलब्ध असतात.

वेबदुनिया वर वाचा