रोगप्रतिकार क्षमता सुधारते
दीर्घ श्वास घेतल्याने ताजी ऑक्सिजन मिळते आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा विषारी पदार्थ आणि कार्बन डाय-ऑक्साइड शरीरातून बाहेर निघतात. जेव्हा रक्ताचे ऑक्सीकरण होतं तेव्हा हे शरीराचे महत्त्वाचे अवयव, तसेच प्रतिरक्षा प्रणालीला सुधारण्यास मदत करतं. शुद्ध रक्ताची आपूर्ती होत असल्याने संक्रमणापासून वाचता येतं अर्थातच रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते.