दालचिनी पूड - 1/4 चमचा
गूळ - 50 ग्रॅम
देसी तूप
कृती-
सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे मीठ, तेल आणि पाणी एकत्र करून मऊ पीठ मळून घ्यावे. व 30 मिनिटे बाजूला ठेऊन द्यावे. आता एका पॅनमध्ये किसलेले गाजर घालून मंद आचेवर 7-8 मिनिटे शिजवून घ्यावे. गाजर शिजल्यावर एका भांड्यात काढून घ्यावे. आता दालचिनी पूड, गूळ घालून चांगले मिक्स करावे. तसेच पिठाचा एक गोळा घ्यावा. व पोळी लाटून घ्यावी. त्यामध्ये हे गाजराचे मिश्रण पसरावे. त्यावर दुसरी पोळी ठेवावी. व हालकसे लाटून घ्यावे. आता तयार पराठा तव्यावर तूप लावून शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपले गाजराचे पराठे, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात.