ऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना आपण डॉक्टरांचा सल्ला विचारत नाही. पण काही औषधांचे दुष्परिणाम असतात. इतकेच नाही, तर विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे व्यायाम करताना त्रास होऊ शकतो. व्यायामावर आणि तुमच्या सर्वांगीण आयुष्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. अशाच काही औषधांविषयी जाणून घेऊ या.
*सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रियुप्टेक इनहिबिटर हे औषध नैराश्य आणि काळजीच्या लक्षणांसाठी दिले जाते. या श्रेणीतली औषधे घेणार्या व्यक्तीला भोवळ आल्यासारखे वाटते, तसच उर्जेची पातळी खालावते. अशा औषधांमुळे व्यायाम करताना तोंड कोरडे पडते. तसेच खूप घाम येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सतत पाणी प्यायला हवे.
*बेंझोडायझेपाइन्स प्रकारची औषधे काळजी, चिंता तसेच एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास दिली जातात. या औषधांमुळे शांत वाटते. ही औषधे घेतल्यानंतर दमल्यासारखे आणि गळल्यासारखे वाटते. यामुळे शारीरिक क्षमता कमी होते आणि व्यायाम करावासा वाटत नाही.
*अॅलर्जीवर दिल्या जाणार्या औषधांमुळे खूप थकवा आल्यासारखे वाटते. या औषधांचा प्रभाव असेपर्यंत तुम्हाला सतत झोप, कंटाळा आल्यासारखे वाटते. अशा औषधांमुळे शरीराचे तापमान खूप वाढते. यामुळे खूप घाम येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.