मी शिवाजी पार्क

शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (12:24 IST)
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांचे कधी मनोरंजन केले आहे तर कधी कानही पिळले आहेत. यावेळीदेखील मांजरेकरांनी हाच डोळसपणा जपत 'मी शिवाजी पार्क' निर्मिला आहे. सिनेमाच्या नावावरून तुम्हाला असे वाटेल की, 'मी शिवाजी पार्क' या स्थळाची ही कहाणी आहे. पण, तसे नसून ही गोष्ट आहे उतारवयाला आलेल्या पाच मित्रांची. जे शिवाजी पार्कमध्ये रोज व्यायामासाठी तर कधी गप्पा मारण्यासाठी एकत्र भेटत असतात. त्यातील एक निवृत्त न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष (विक्रम  गोखले) आहे. तर एक डॉक्टर रुस्तम मेस्त्री (शिवाजी साटम), निलंबित पोलीस अधिकारी दिगंबर सावंत (अशोक सराफ), सीए सतीश जोशी (सतीश आळेकर) आणि प्राध्यापक दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर) आहे. सिनोच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्राणे हे पाच मित्र कोणत्यातरी प्रकरणाचा छडा लावण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण कोणते तर 'अन्याय' झालेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे. 
 
दिग्दर्शकाला आपल्या गोष्टीत प्रेक्षकांना लवकरात लवकर गुंफण्यासाठी पटकथेतील पुढील काही प्रसंगांमध्येच तो सिमेमाच्या मूळ विषयाला हात घातलो. त्यात सतीश जोशी या गृहस्थाच्या आयुष्यात एक घटना घडते. त्यात दोषी असलेला आरोपी पैश्यांच्या बळावर स्वतःचा जामीनकरून घेतो खरा. पण, ही बाब एकविचारी मित्रांना मात्र खटकते. त्यात आपल्यातीलच एका मित्रावर अन्याय होतोय म्हटल्यावर त्यांना ती अस्ताव्यस्त करते. यातूनच स्वतः स्वतःला न्याय मिळवून देण्याचा मार्ग हे मित्र कसा काढतात? त्यातील एक निवृत्त न्यायाधीश, एक निलंबित पोलीस आणि एक डॉक्टर असल्याने आपापल्या पेश्याप्राणे काम वाटून घेतात. याची परिणिती म्हणजे ते न्यायालयाबाहेर न्यायालय कसे स्थापन करतात? आरोप्यावर स्वतःच्या न्यायालयात चौरंगी खटला ते कसा चालवतात? आणि शेवटी त्या आरोप्याला मृत्यूदंड देतात की नाही? आदींची नाट्ययता पाहणे रंजक ठरते. सिनोचा पूर्वार्ध थोडा विस्कळीत आणि अधिक नाट्यमय वाटला असला तरी तो प्रेक्षकांना आपल्या आसनात खिळवून ठेवतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती