कृती-
सर्वात आधी मखाने कुरकुरीत भाजून घ्या. आता मखाने थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये घालून पावडर बनवा, एका भांड्यात काढा. आता एका मोठ्या प्लेटमध्ये सिंगाडा पीठ, भगर पीठ, आणि मखाना पावडर घाला आणि चांगले मिसळा. यानंतर, उकडलेले बटाटे मॅश करा आणि त्यात मिसळा. आता चिरलेली हिरवी मिरची, सेंधव मीठ, मिरे पूड आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा. नंतर थोडे थोडे पाणी घाला आणि पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. पीठ जास्त चिकट ठेवू नका आणि नंतर ते सुती कापडाने झाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता पराठा तुटू नये म्हणून रोलिंग पिनवर थोडे तूप किंवा रिफाइंड तेल लावा. पराठा लाटण्यापूर्वी गॅसवर पॅन गरम करा आणि त्यावर थोडे तूप लावा. आता त्यावर पराठा ठेवा आणि तो सोनेरी होईपर्यंत चांगला बेक करा. व आता एका प्लेटमध्ये काढून घ्या. तर चला तयार आहे आपली उपवासाची रेसिपी मखाने पराठे चटणी आणि दह्यासोबत नक्कीच सर्व्ह करा.