कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाटे घेऊन ते सोलून घ्यावे. आता एका बाऊलमध्ये त्याचे लहान तुकडे करा. त्यात भाजलेले शेंगदाणे, मिर्चीचे तुकडे, सेंधव मीठ आणि मिरे पूड घाला. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यावर लिंबाचा रस घालावा. आता वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली उपवासाची आलू पीनट चाट रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा.