पोटाच्या चरबीमुळे लोक खूप चिंतेत असतात. कारण चरबी वितळणे फार कठीण आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशात आम्ही आपल्याला अशाच काही पोटाच्या व्यायामाबद्दल सांगणार आहोत ज्या आपण केवळ दहा मिनिटेही केलेत तर हळूहळू तुमचे लटकणारे पोट कमी होईल. काही लोक वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून असतात परंतु त्यासोबत शारीरिक हालचालीही खूप महत्त्वाच्या असतात.
पोटाची चरबी कमी करण्याचा व्यायाम
पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चक्की चलनासन करावे. याने कंबर आणि पोटावर दाब निर्माण होतो ज्यामुळे चरबी हळूहळू वितळू लागते. आपण हे 10 मिनिटांसाठी देखील केले तर काही दिवसात परिणाम दिसून येतील.