कांद्याचे साल फेकू नका... त्याचे सालीचे 7 चमत्कारी फायदे जाणून घ्या

शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:29 IST)
Onion Peels कांद्याच्या सालीचे 7 फायदे
कांद्याच्या सालीमध्ये लपलेली आरोग्य आणि सौंदर्याची ही 7 गुपिते जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना फेकून देणे सोडाल.
 
1. कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी गाळून प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
 
2. कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास त्वचेची ऍलर्जी दूर होईल.
 
3. जर तुम्हाला तुमचे केस मऊ, सुंदर आणि चमकदार बनवायचे असतील तर केस धुण्यासाठी कांद्याच्या सालीच्या पाण्याचा वापर करा.
 
4. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही कांद्याच्या सालीचा रस वापरला जातो.
 
5. कांद्याची साले गरम पाण्यात उकळा, नंतर हे पाणी गाळून प्यायल्याने घसा खवखवणे बरे होते.
 
6. कांद्याची साले गरम पाण्यात उकळा, नंतर हे पाणी गाळून प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
 
7. कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात जे केस, त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असतात.
 
डिस्क्लेमर: डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घरगुती उपचार करून पहावे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती