बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की सकाळी उठल्यावर त्यांच्या तोंडाला वास येतो. रात्री ब्रश करून देखील सकाळी तोंडाला वास येतो.त्या मागील कारण असे की आपल्या तोंडात काही प्रमाणात बॅक्टेरिया असतात जे तोंड कोरड झाल्यामुळे झपाट्याने वाढतात.या मुळे वास येतो .आपण जेव्हा काही खातो तेव्हा तोंडात राहणारे बॅक्टेरिया लाळ एकत्र करतात आणि अन्न आणि प्रथिने तोडतात. या प्रक्रियेत सोडल्या गेलेल्या गॅस मुळे तोंडाचा वास येतो.झोपण्यापूर्वी दात आणि जीभ स्वच्छ केल्याने तोंडाच्या वासाची समस्या कमी करू शकतो.बरेच लोक माऊथवॉश वापरतात, परंतु याचा प्रभाव तात्पुरतीच असतो. नंतर तोंडाला वास येतो.तोंडाला वास येणं हे हेलीटोसिस ची लक्षणे असू शकतात.हे तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे असू शकते. तोंडाचा वास न येण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत,यांना अवलंबवून आपण वासावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घ्या.
2 दात स्वच्छ करण्यासाठी टूल किट ठेवा -दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी आपल्यासह टूल किट ठेवा. या मध्ये दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश, जिभेच्या स्वच्छतेसाठी मेटल किंवा प्लास्टिकचा टंग क्लिनर आपल्या जवळ बाळगा.जेणे करून तोंडाची चांगल्या प्रकारे स्वच्छता होऊ शकेल.