एक काळ असा होता की मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटणे तर फार दूर ते आपसात बोलत देखील नव्हते आणि त्यांचे लग्न कुटुंबाच्या संमतीने लावून द्यायचे .पण आता काळ बदलला आहे आणि मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करतात त्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण जगभरात अविवाहित राहण्याचा ट्रेंडही वाढत आहे. लोक लग्न टाळत असल्याचे दिसून येत आहे, कारण अविवाहित राहून ते सुखी आयुष्य जगू शकतात असे त्यांना वाटते.चला तर याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या.