मुल्ला नसरुद्दीनच्या दोन बायका

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (09:25 IST)
मुल्ला नसरुद्दीन हे खूप बुद्धिमान होते. परंतु ते आपल्या बायकांशी खूप त्रासलेले होते. त्यांना दोन बायका होत्या. दोन्ही त्यांना विचारायच्या की आपण सर्वात जास्त प्रेम कोणावर करता. ते काहीच बोलू शकत नव्हते. 
एके दिवशी त्यांना एक युक्ती सुचते ते आपल्या बायकांना एक एक  निळा मणी आणून देतात आणि दोघींना सांगून ठेवतात की मी तुला हा मणी दिलेला आहे, हे कोणालाही सांगू नको.त्यांच्या बायका ते मणी बघून खूप आनंदी होतात. आता जेव्हा कधी त्यांच्या बायका त्यांना विचारतात की आपण सर्वात जास्त कोणावर प्रेम करता तेव्हा ते उत्तर द्यायचे की जिच्या कडे तो निळा मणी आहे माझे सर्वात जास्त तिच्या वर प्रेम आहे. असं ऐकून त्यांच्या बायका आनंदी व्हायायच्या. आणि मुल्लाजी देखील आपल्या चातुर्यावर आनंदी व्हायचे. 
 
शिकवण- बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने कठीण समस्या मधून देखील मार्ग काढता येतो. समस्या सहजपणे सोडविली जाऊ शकते.  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती