चिमणी आणि अभिमानी हत्ती

शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:45 IST)
एका झाडावर एका चिमणीने एक सुंदर घरटे बनवले होते आणि त्यात ती चिमणी आपल्या पतीसह राहत होती. तिने त्या  घरट्यात अंडी दिली होती .चिमणी संपूर्ण दिवस त्या अंडींना उबवत बसायची. त्या चिमणीचा पती त्या दोघांसाठी अन्न शोधून आणायचा. ते दोघे खूप आनंदात राहत होते आणि  अंडी मधून आपली पिल्लं निघण्याची वाट बघत होते. 
एके दिवशी त्या चिमणीचा पती अन्नाच्या शोधात दूरवर निघून गेला. चिमणी आपल्या अंडीचा सांभाळ करत होती. तेवढ्यात तिथून एक हत्ती निघाला आणि त्याने त्या झाडाच्या फांदीनां तोडण्यास सुरु केले. तो स्वतःमध्ये मस्त होता आणि सहजपणे झाडाच्या फांदी तोडत होता. त्याने त्या चिमणीचे घरटे देखील पाडले आणि त्यामधील अंडी फुटले. चिमणी फार दुखी झाली. तिला हत्तीवर राग येत होता. त्या चिमणीचा पती परत आल्यावर त्याने बघितले की चिमणी फांदीवर बसून रडत आहे. तिने त्याला घडलेले सर्व सांगितले ते दोघे खूप दुखी झाले.त्यांनी त्या अभिमानी हत्तीला धडा शिकविण्याचा विचार केला. ते  सुतार पक्षाकडे गेले तो त्यांचा जिवलग मित्र होता. त्यांनी आपल्या मित्राला हत्तीला धडा शिकविण्यासाठी त्याची मदत हवी म्हणून घडलेले सर्व सांगितले. सुतारपक्षीचे दोन अजून मित्र होते. मधमाशी आणि बेडूक त्याने आपल्या त्या मित्रांना देखील आपल्या युक्तीमध्ये सामील केले. 
युक्तीप्रमाणे मधमाशी हत्तीच्या कानात शिरून त्याला त्रास देऊ लागली. सुतारपक्षाने त्याचे डोळे फोडले. हत्ती ओरडू लागला. बेडूक आपल्या परिवारासह दलदल जवळ आला  आणि मोठ्या मोठ्याने आवाज करू लागला. हत्तीला वाटले की जवळच तलाव आहे म्हणून तो त्या दलदलात शिरला आणि अडकून गेला. अशा प्रकारे चिमणीने मधमाशी,सुतारपक्षी आणि बेडकाच्या मदतीने अभिमानी हत्तीला धडा शिकवला.
 
शिकवण- या कहाणी पासून शिकवण मिळते की एक्याने आणि बुद्धीचा वापर करून मोठ्या समस्येला देखील दूर केले जाऊ शकते.     
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती