तेनालीराम ची कहाणी मृत्युदंड

शुक्रवार, 26 मार्च 2021 (21:11 IST)
एकदा बिजापूर नावाच्या देशातील सुलतान ला ही भीती वाटत होती की राजा कृष्णदेव राय त्याच्या राज्यावर हल्ला करून त्याला ठार मारतील. कारण त्याने असे ऐकले होते की राजा कृष्णदेव राय खूप पराक्रमी आणि सामर्थ्यवान राजा आहे आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर अनेक राज्य जिंकले आहेत. 
याचा विचार करत त्याचा मनात युक्ती येते की जर आपण कृष्णदेव राय ला ठार मारले तर देश देखील वाचेल. असा विचार करत तो सुलतान कृष्णदेव रायाच्या हत्येचा कट रचतो आणि थेट तेनालीरामचा एक मित्र असतो कनकराजू त्याच्या कडे जाऊन त्याला आपल्या योजनेत सामील करतो. कनक राजू राजाच्या हत्येची योजनेचा विचार करून आपल्या मित्राच्या म्हणजेच तेनालीरामच्या घरी जातो. आपल्या मित्राला अचानक बऱ्याच वर्षानंतर आपल्या कडे आलेलं बघून तेनालीला आनंद होतो. तो त्याचे स्वागत करतो. 
काही दिवस कनकराजू त्याच्या कडे थांबतो आणि एकदा तेनालीराम कामानिमित्त बाहेर गेला असताना कनकराजू महाराजांकडे तेनालीच्या नावाने निरोप पाठवतोकी आपण या क्षणी माझ्या घराकडे आला तर मी आपल्याला एक अद्भुत वस्तू दाखवेन.असा निरोप मिळाल्यावर राजा कृष्णदेव तेनालीच्या घराकडे जायला  निघतात. तेनाली कडेच जायचे आहे म्हणून ते निःशस्त्र जातात आणि आपल्या अंगरक्षकांना देखील बाहेरच थांबण्यासाठी सांगतात. आत गेल्यावर कनकराजू त्यांच्यावर हल्ला करतो. राजा कृष्णदेव राय सावध असतात आणि ते कनकराजूचा  वार थांबवतात ,आपल्या अंगरक्षकांना त्याला बंदिस्त बनवायला सांगतात आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा देतात. 
राजा कृष्णदेव राय चा नियम होता की राजावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला जो आश्रय देतो त्याला देखील मृत्युदंड देणार .म्हणून तेनालीरामला देखील मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तेनाली राजा कडून केलेल्या कृत्याची माफी मागत त्यांना माफ करण्याची विनवणी करतात परंतु राजा त्याला सांगतात -" की मी तुझ्यासाठी देखील माझे नियम मोडणार नाही. सांग तुला कसे मृत्यू दंड पाहिजे. हा निर्णय तूच ठरव. "
राजाचे एवढे म्हणणे होते की तेनाली लगेच म्हणाले की ''महाराज मला म्हतारपणीचा मृत्युदंड पाहिजे. " हे ऐकून सर्व आश्चर्य करतात. राजा कृष्णदेव राय देखील तेनालीच्या चातुर्याला चकित झाले आणि त्यांनी तेनालीची प्रशंसा केली. ते हसले आणि म्हणाले की "तेनाली आज आपण आपल्या चातुर्याने वाचला. "    
 
शिकवण- प्रसंग कितीही कठीण असेल तरी समजूतदारीने काम केल्यावर समस्येतून सुटका मिळू शकते. तेनालीने देखील असेच केले. परिस्थितीला घाबरून न जाता बुद्धी ने आपले प्राण वाचविले.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती