काही वर्षांपूर्वी वरुण पर्वता जवळ एक राज्य वसलेले होते. त्या राज्यात एक मोठा साप मंदविष राहत होता. वृद्धापकाळामुळे त्याला शिकार सहजपणे मिळत नव्हते. एके दिवशी त्यानी एक युक्ती आखली तो बेडकांनी भरलेल्या तलावाच्या जवळ राहण्यासाठी गेला.तिथे गेल्यावर एका दगडावर जाऊन दुखी चेहरा घेऊन बसला. जवळच्या दगडावर बसलेल्या एका बेडकाने त्याला विचारले की काका '' काय झाले आपण एवढे दुखी का आहात. आपण शिकार करू शकत नाही म्हणून दुखी आहात का?
सापाने उदास होऊन त्याला होकार दिला आणि कहाणी सांगितली. की आज एका बेडकांचा पाठलाग करताना मी त्या बेडकाच्या मागे जात होतो. एकाएकी तो बेडूक ब्राह्मणाच्या कळपात जाऊन शिरला आणि लपून गेला. मी त्या बेडकाचा शिकार करतांना चुकीने त्या ब्राह्मणाच्या मुलीला दंश केला. या मुळे ती मरण पावली. रागावून ब्राह्मणांनी मला श्राप दिले. आणि ते म्हणाले की या कृत्याचे पश्चाताप म्हणून तुला बेडकाची स्वारी करावी लागेल. या कारणास्तव मी इथे आलो आहेत.
हे ऐकल्यावर तो बेडूक पाण्यात गेला आणि आपल्या राजाला त्या सापाने सांगितलेले सर्व काही सांगितले. आधी तर राजाला या वर काही विश्वास बसेना. नंतर विचार करून बेडकांचा राजा जलपाक सापाच्या फणावर जाऊन बसला. राजाला असं करता बघून इतर बेडकांनी तसेच केले ते सापाच्या फणावर जाऊन बसले. नंतर त्यांना घेऊन मंदविष हळू हळू चालू लागला. असं काही दिवस चालले नंतर साप बेडकांना घेऊन सवारी करू लागला. त्याने आपली चालण्याची गती मंद केली. त्याला राजाने विचारले की तू चालणे का मंद केले.त्यावर तो म्हणाला की एक तर मी वृद्ध आहे आणि माझ्यात काही शक्ती नाही. त्यामुळे मला चालता येणं अवघड झाले आहे. त्यावर राजा म्हणाला की असं असेल तर दररोज तू छोटे-छोटे बेडूक खात जा. या मुळे तुला बळ मिळेल. मंदविष मनात हसला. त्याची युक्ती काम करत होत होती. तो म्हणाला की तस तर मला श्राप आहे म्हणून मी बेडूक खाऊ शकत नाही. परंतु आपण राजा आहात आपली जशी आज्ञा आहे मी तसे करेन. असं म्हणत तो दोन चार बेडूक खाऊ लागला आणि लवकरच तब्बेतीने छान झाला. एके दिवशी त्याने राजाचा पण शिकार केला आणि त्या तलावातील सर्व बेडकांना देखील खाऊन टाकले.त्या सापावर विश्वास ठेवल्याने बिचाऱ्या बेडकांना आपले प्राण गमवावे लागले.