अकबर -बिरबल कहाणी - प्रथम कोंबडी की अंडी ?

शुक्रवार, 12 मार्च 2021 (09:25 IST)
एकदा बादशहा अकबरच्या दरबारात एक विद्वान पंडित आला .त्याच्या कडे बरेच प्रश्न होतें ज्यांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी तो आला होता. त्याच्या प्रश्नांचे उत्तर देणे बादशहा ला कठीण झाले, तर त्यांनी त्याच्या प्रश्नाने उत्तर देण्यासाठी बिरबलाला समोर केले. बिरबलाच्या चातुर्याला सर्व जाणून होतें. त्यांना माहीत होतें की बिरबल त्याच प्रश्नाचे अचूक उत्तरे देणार .
त्या विद्वान पंडिताने बिरबलाला म्हटले '' मी आपल्याला दोन पर्याय देतो की एक तर आपण माझ्या 100 सोप्या प्रश्नांचे उत्तरे द्या किंवा माझ्या एकाच कठीण प्रश्नाचे उत्तर मला द्या. " बिरबलाने विचार केल्यावर त्याला उत्तर दिले की मी आपल्या एकाच प्रश्नाचे उत्तर देईन." 
 
नंतर त्या पंडिताने बिरबलाला विचारले की "सांगा  आधी कोंबडी आली की अंडी ?"
बिरबलाने त्वरितच त्याला उत्तर दिले " कोंबडी आधी आली ".
नंतर त्या पंडिताने बिरबलाला विचारले की आपण हे कसे सांगू शकता की आधी कोंबडी आली .लगेच बिरबल म्हणाले की आपण मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यायचे कबूल केले होतें हे आपले दुसरे प्रश्न आहे. मी ह्याचे उत्तर देऊ शकणार नाही. मी ठरल्याप्रमाणे आपल्या एकाच प्रश्नाचे उत्तर देईन. 
अशा परिस्थितीत पंडित दरबारातून काहीही न बोलता निघून गेला. बिरबलाच्या चातुर्याने अकबर खूप खुश झाले आणि त्यांनी बिरबलाचे खूप कौतुक केले. 
 
शिकवण - योग्य मार्गाने आणि संयम ठेऊन प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सोडवले जाऊ शकते आणि प्रत्येक परिस्थितीवर समाधान मिळू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती