त्या शेळीचे भांडण वाढत गेले की त्यांनी एकमेकांना जखमी करून रक्तबंबाळ केले. तरीही त्या भांडत होत्या.दोघींच्या शरीरातून रक्त निघत होते. भुकेल्या लबाड लांडग्याने जमिनीवर रक्त सांडलेले बघून ते चाटण्यास सुरू केले आणि त्या शेळीच्या मध्ये जाऊ लागला. त्याची भूक अधिक वाढली होती. त्या लबाड लांडग्याच्या मनात आले की मी या दोन्ही शेळ्यांना मारून खाऊन आपली भूक भागवेन.असा विचार करत तो त्या शेळींच्या मध्ये जाऊ लागला.
भिक्षुक असा विचार करतच होते की तो लबाड लांडगा दोन्ही शेळ्यांच्या मध्ये जाऊन पोहोचला. त्या लांडग्याला आपल्या मध्ये आलेले बघून त्या दोन्ही शेळींनी भांडण सोडून त्याचा वर हल्ला केला. अचानक आपल्यावर झालेल्या या हल्ल्याला बघून लांडगा घाबरला आणि स्वतःला सांभाळू शकला नाही त्याला या मुळे दुखापत झाली. तो आपला जीव वाचवत तिथून पळाला.