बोध कथा - कबूतर आणि मधमाशीची कहाणी

बुधवार, 10 मार्च 2021 (09:25 IST)
एकेकाळी एका जंगलात एका नदीच्या काठी एका झाडावर कबूतर राहायाचा. एके दिवशी त्या जंगला मधून एक मधमाशी उडत असताना एकदम पाण्यात पडली. तिचे पंख ओले झाल्यामुळे तिला काही बाहेर येत येतं नव्हते. तिला वाटले की आता ती पाण्यात बुडून मरेल. तिने मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली. तिची आवाज त्या झाडावरच्या कबूतराने ऐकली आणि तो तिच्या मदतीसाठी उडत गेला. त्यांनी त्या मधमाशीचे प्राण वाचविण्यासाठी झाडाचे एक पान त्या मधमाशीच्या दिशेने फेकले. पान मिळतातच ती मधमाशी त्या पानावर जाऊन बसली. तिचे पंख देखील  वाळले होते. ती उडण्यासाठी तयार होती. तिने कबूतराला तिचे प्राण वाचविण्यासाठी धन्यवाद दिले. नंतर ती मधमाशी तिथून निघून गेली .
या प्रकरणाला बरेच दिवस झाले. एके दिवशी कबूतर झोपला होता. तेवढ्यात एक उनाड मुलगा आपल्या बेचकीने त्यावर नेम धरतो , कबूतर झोपल्यामुळे त्याला हे काहीच माहीत नसते. तेवढ्यात तिथून तीच मधमाशी निघत असते  जिचा जीव कबूतराने वाचविला होता. तिने कबुतराचा जीव धोक्यात असलेला बघून कबुतराचा जीव वाचविण्यासाठी  त्या मुलाला जोरात चावली आपल्याला मधमाशीने चावल्यावर तो मुलगा जोरात किंचाळून बेचकी फेकून ओरडू लागतो. त्याचा आवाजाला ऐकून कबूतर जागा होतो आणि त्याला काय घडले आहे हे लक्षात येतं. तो मधमाशीला त्याचे जीव वाचविण्यासाठी धन्यवाद म्हणून तिचे आभार मानून ते दोघे जंगलाच्या दिशेने उडून जातात. 
       
शिकवण- नेहमी संकटात असलेल्या व्यक्तीची मदत करा. असं केल्याने भविष्यात चांगले परिणाम मिळतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती