रंग आणि व्यक्तीचा स्वभाव!

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (23:30 IST)
ज्योतिष शास्त्रानुसार आपला जसा स्वभाव असेल त्याच प्रकारचा रंग आपल्याला आवडत असतो. रंगांचा ग्रहांशी संबंध असतो. त्यामुळे आपल्या आवडत्या किंवा नावडत्या गोष्टींवर त्यांचा शुभ अशुभ प्रभाव पडतो.
 
रंगाचे नाव - लाल, काळा, निळा, हिरवा, पिवळा या पाच रंगामधून एक रंग निवडा .
 
लाल रंगानुसार तुमचा स्वभाव
तुमच्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्व असून तुम्ही खूप सावध राहणारे व्यक्ती आहात. तुम्ही एक चांगले प्रेमी बनू शकता.
 
काळ्या रंगानुसार तुमचा स्वभाव
दिनक्रमात झालेला बदल तुम्हाला आवडत नसून तुमचा स्वभाव रूढीवादी आहे. तसेच तुम्हाला राग लवकर येतो.
 
निळ्या रंगानुसार तुमचा स्वभाव
तुम्ही स्वाभिमानी व्यक्ती आहात, कोणाची मदत घेणे तुम्हाला आवडत नाही.
 
हिरव्या रंगानुसार तुमचा स्वभाव
तुम्ही खूप शांत स्वभावाचे व्यक्ती आहात. भांडण करणे हे तुमच्या स्वभावातच नसते.
 
पिवळ्या रंगानुसार तुमचा स्वभाव
सर्वांना मदत करण्यासाठी तुम्ही सतत तयार असता. तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती आहात. दुस-यांना योग्य मार्गदर्शन करू शकता.
 
नऊ ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थितीनुसार मनुष्याच्या स्वभावात परिवर्तन होऊ शकते.

संबंधित माहिती

पुढील लेख