पूर्वी अगदी पूर्वी सासूने खरोखरच सुनेला फार जाच केला, असे ऐकू येत असे. त्याला काहीही कारणे असोत मात्र तेव्हापासून सासू-सुनेचे नाते दुषित झाले आहे. तेव्हा तेवढ्या तीव्रतेने नसला तरी मधल्या काळात सुनेनेही त्याचा बदला घेतल्याचे वाचण्यात येते. पूर्वी ही 'चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे', ही म्हण प्रचलीत होतीच. यातील सत्यता पारखणे फार कठीण! आईची सासू होतानाची घालमेल मात्र आजही दृष्टोत्पत्तीस पडते.
पहिल्या मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. ते सुख सासू या नात्याशी निगडित होते आणि आईतील आईपण दुखावते. समाजात सासू एक उपेक्षित नाते ठरले आहे. त्याला पूर्वी अनेक कारणे होती. बदलत्या परिस्थितीनुसार कारणे शिल्लक राहीली नाहीत. पण नाते मात्र उपेक्षीत ठरले ते कायमचे. आज या उपेक्षीत नात्याला अपेक्षीत स्थान मिळण्याची आवश्यकता आहे. ते स्थान ज्याचे त्याने मिळविणे जास्त योग्य. तरी देखील समाजाचा सासूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे.
सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव. घराघरातून सासू आणि सुनेचे वास्तव्य असतेच की, किंबहूना एकाच स्त्रीला दोन भूमिका कराव्या लागतात. आजची सून उद्याची सासू असतेच ना? पण कुणाच ठाऊक हे दोन जीव एकमेकांना इतक्या दुराव्याने का पाहातात ते! मुलाचे लग्न हे मुलाच्या जीवनाबरोबर आईच्या जीवनातील क्रांतीच ठरते. आजपर्यंत तिच्यकडे सून किंवा गृहिणी म्हणून पाहणारा समाज तिला सासू म्हणून ओळखू लागतो. बिचारी सासू समाजात येणार्या अनेक अनुभवावरून ह्या नव्याने येणार्या अनुभवाला तोंड देण्यास सज्ज होते आणि आपत्य प्रेमाला पारखी होते.
माहेरची माया तोडून दुसर्या घरात समरस होताना कोणत्या यातना होतात याची सासूला अधिक कल्पना असते. याच अनुभवाच्या आधारे खरे तर सासूच सुनेला प्रेमाने शिकवीत असते. मात्र समाजातील रिकाम्या लोकांना नसत्या उठाठेवी असतात
पूर्वी एकत्र कुटुंबपध्दती होती. मुली लग्नात लहान असत. मातृत्वही त्यांना लहानपणीच प्राप्त होत असे. त्यांचर मुले त्यांच्या आत्या, काकू यांच्या मुलांबरोबर कुठे कशी वाढत असत हे त्यांच्या आयांना देखील कळत नव्हते. आई पेक्षा मुलांना आजीचाच लळा जास्त असे. पण आजच्या विभक्त कुटुंबात आजी, काकू, आत्या कोणी कोणी मुलांना दिसत नाही. दिसते फक्त आई! आई हेच मुलांचे दैवत. या देवतावर मुलांची फार भक्ती असते. समाजात दिसणार्या विविधतेमुळे काही मुले आडमार्गाने जातात. हे खरे असले तरी त्यांची आई दारात किंवा बाहेर (नोकरी निमित्त) जाणार्या आईच्या कष्टाची जाणीव झालेल्या मुलांचे आपल्या आईवर फार प्रेम असते. मुलं मोठी झाली की, त्यांची लग्न होऊन घरात सून येते. मुलगा वयात येताना त्याच्यात होणारे बदल पाहून आई मनोमन आनंदीत होते. येणार्या सुनेचे लक्ष्मीच्या आगमनाप्रमाणे उत्साहाने स्वागत करते. सुनही माझं घर, माझी माणसे ह्या भावोत्कटतेने तिच्या नवीन घरात प्रवेश करते. पण ही नव्याची नवलाई वर्षां दोन वर्षात संपुष्टात येते. वास्तविक समाजाने दुषीत केलेले सासू सुनेचे नाते आजच्या सुज्ञ सासू सुनांनी पुन्हा नव्याने प्रज्वलीत करण्याची गरच आहे.
विवाह ही एक तडजोड आहे. जन्मदेत्या आईवडलांबरोबर, भावाबहिणी बरोबर सुध्दा मुलींना जुळवून घ्यावेच लागते. तेव्हा नवरा, सासू- सासरे ह्या नव्याने जुडणार्या नात्याबरोबर जुळवून घेणे आवश्यक असते. सासवा ही आज सुशिक्षित असतात. दोन पिढ्यांमधील अंतर त्या देखील जाणू शकतात. 'आमच्या वेळेला नव्हतं बाई असं', असं म्हणून सुनांना आणि मुलांना नाराज करण्याची आवश्यकता आजच्या सासवांना नाही.
समाजाने सासूला वाईट अथवा दृष्ट समजण्याचे काही कारण नाही. माझ्या मुलाचे सुख म्हणून सासू सुनेकडे पाहत असते. त्यासाठी करता येईल तेवढ्या गोष्टींचा त्याग ती करत असते. सासूने केलेली प्रत्येक गोष्ट केवळ कर्तव्य आहे. म्हणून त्यात प्रेमाचा ओलावा नाही ही जी समाजाकडून शिकवण किंवा जाणीव नववधुला दिली जाते, ती अत्यंत चुकीची आहे. सासू आणि सुन यांच्या चांगल्या संबंधावरच तर संसाराचा मनोरा उभा असतो. त्यांच्याच असणारे प्रेम हे शुध्द असावे. प्रेमाच्या व्यवहाराला तडजोडीची जोड असावी लागते. त्या दृष्टीने सासूनेही घरात सुन आली की, आपले स्थान कोणते ? हे समजून घ्यायला हवे. आपल्या कामाची निवड करून ते काम प्रेम आणि मन ओतुन करावे. भाषेतील मार्दव मात्र दोघीनांही सारखेच आवश्यक आहे.
माहेरची माया तोडून दुसर्या घरात समरस होताना कोणत्या यातना होतात याची सासूला अधिक कल्पना असते. याच अनुभवाच्या आधारे खरे तर सासूच सुनेला प्रेमाने शिकवीत असते. मात्र समाजातील रिकाम्या लोकांना नसत्या उठाठेवी असतात
माहेरची माया तोडून दुसर्या घरात समरस होताना कोणत्या यातना होतात याची सासूला अधिक कल्पना असते. याच अनुभवाच्या आधारे खरे तर सासूच सुनेला प्रेमाने शिकवीत असते. मात्र समाजातील रिकाम्या लोकांना नसत्या उठाठेवी असतात. सासूने सद्भावनेने सांगितलेली गोष्ट सुनेलाही पटत असते. पण रिकामटाकड्या लोकांच्या खोठट्या गोड शब्दांना भाळून बिचारी अनुभव नसलेलली नवीन सुन सासूचे प्रेम गमवून बसते. अशा या सासू सुनेच्या जगुलबंदीत सासरा आणि नवर्याची केविलवाणी अवस्था होते. एकदा तेढ निर्माण झाला की, दिलजमाई होणे फार कठीण होत असते. सुरवातीचे चार पाच वर्षे फार महत्त्वाची असतात. मधल्या काळात सुना शिकलेल्या तर सासवा अक्षरशुन्य होत्या. पण आज सुनाच्या बरोबरीने सासवा शिकलेल्या आहेत. सासूच्या गाठी 25 ते 30 वर्षांचा अनुभव असतो तर प्रगत आणि गतीमान युगात वावरणारी सुनही बुध्दीने प्रगल्भ असते. पूर्वीप्रमाणे सुनेचे वास्तव्य सासुकडे कायमचे नसते. नवलाईने संसार सुख उपभोगण्याचे स्वातंत्र्य सुनाना असते. दोन दिवस सुनेची अडचण निभवून देण्याकरता किंवा दोन दिवस मुलांचा आनंद पाहण्याकरता सासू सुनेकडे जाते, तेवढ्या वेळात एकमेकांशी प्रेमाने राहणे त्यांच्यासाठी अवघड असते.
सूनेदेही घरातील एक परमपुज्य व्यक्ति म्हणून सासूकडे भावभक्तिनेच पाहायला पाहिजे. त्या दोघांचीही 'स्त्री' ही एकच जात आहे. त्यातच दृश्य व अदृश्य आई आणि सासू हे नाते वास करत आहे. आई आणि सासू हे संसाराची दोन रूपे आहेत तर एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. रूपया खणखणीत असला तर सुखाला काय वाण..!