वयोमर्यादा आणि पात्रता-
अग्निवीर वायु उमेदवाराचे वय 17 ते 23 वर्षे दरम्यान असावे, 12वी मध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत . मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विज्ञानेतर विषयांसाठी, मान्यताप्राप्त बोर्डातून इंग्रजीमध्ये ५०% गुणांसह आणि एकूण किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा इंजिनीअरिंग आणि दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले देखील अग्निवीर वायुसाठी अर्ज करू शकतात.