याचं उत्तर शोधण्याचा लहानसा प्रयत्न बघा..
दोन मित्रांची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एका मित्राने दुसर्याला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा.
प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस दुसर्या मित्राला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा. मग मित्र काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचाऐ. तो पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.
काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मग वैतागलेल्या मित्राला देखील आता लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला, अशी त्या दोघा मित्रांची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला.