पीएफ खात्यात असे अपडेट करा KYC

नोकरीत असणार्‍या लोकांच्या पगारातून काही भाग एम्प्लॉयी प्रोव्हिडेंट फंडमध्ये जमा होतो. काही लोकांच्या पीएफ स्टेटमेंटमध्ये नाव किंवा जन्म तारीख आधारामध्ये दिलेल्या माहितीशी जुळत नाही. अशात फंड काढताना समस्या येते. अलीकडेच सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे 8.38 कोटीहून अधिक पीएफ अकाउंटमध्ये सदस्यांची जन्मतारीख चुकीची आहे जेव्हाकि 11.07 कोटी खात्यांमध्ये सदस्यांच्या वडिलांचे नाव नाही. म्हणून सर्वात आधी आपल्या पीएफ फंडमध्ये आपले नाव आणि जन्म तारीख आधारामध्ये दिलेल्या माहितीशी जुळत आहे की नाही हे तपासून घ्या. यात फरक असल्यास अपडेट करण्यासाठी हे करा:
 
अपडेट करण्यासाठी आवश्यक
अॅक्टिव्ह युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)
EPFO च्या वेबसाइटची माहिती
आधार नंबर
आपले आवेदन EPFO ला पाठवा
EPFO रेकॉर्डमध्ये बदल करण्यापूर्वी आपल्या आधारात दिलेली माहिती प्रमाणित असल्याचे सुनिश्चित करावे.
 
या प्रकारे अपडेट करा पीएफ डिटेल
हे दोन प्रकारे होऊ शकतं. एक एम्प्लॉयी स्तरावर आणि दुसरे एंप्लॉयर स्तरावर
EPFO च्या मेंबर यूनिफायड पोर्टलवर जाऊन येथे पुरवण्यात आलेली माहिती आधारात दिलेल्या माहितीप्रमाणे अपडेट करा.
याची सूचना आपल्या एंप्लॉयर द्या.
सिस्टम ही माहिती आधाराशी जुळवून बघेल.
वेरिफिकेशन झाल्यावर हे आवेदन एंप्लॉयरला ट्रांसफर केले जाईल.
नंतर एंप्लॉयर आवेदन EPFO ला पाठवेल.
EPFO यात आवश्यक सुधार करेल.
 
ऑफलाईन अपडेट करण्यासाठी या संबंधित फॉर्म एम्प्लॉयी आणि एंप्लॉयर द्वारे भरल्या गेल्यावर EPFO ऑफिसात पाठवले जाऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती