या प्रकरणी ईपीएफओने द्वारकाधील पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून ईपीएफओच्या एका कर्मचार्याला ताब्यात घेतले आहे. घोटाळा किती मोठा आहे आणि त्यात कोण-कोण सामील आहे हे चौकशीतून स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
ईपीएफओद्वारे वर्षाचा ताळेबंद तपासण्यात येत असताना हा घोटाळा उघड झाला आहे. ऑनलाइन कॅश ट्रॅन्झॅक्शनची रक्क्म आणि खात्यातील जा रकमेत कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे तपासणीत समोर आले. काही ट्रॅन्झॅक्शन अशा अकाउंट्समध्ये झालेत ज्यांची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनाही नाही. यामुळे सुरुवातीला ईपीएफओद्वारे अंतर्गत चौकशी करण्यात आली होती.