महान फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्त्रडेमसचा जन्म 14 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर 1503 मध्ये फ्रान्समधील एक छोटे गाव सेंट रेमी येथे झाला. त्याने तरुण वयापासूनच भविष्य सांगण्यास सुरुवात केली होती. एकदा तो आपल्या मित्राबरोबर इटलीतील रस्त्यावरून जात असताना त्याला गर्दीत एक तरुण दिसला. नॉस्त्रॅडेमसने या तरुणासमोर जाऊन त्याला अभिवादन केले. मित्राने त्याला याचे कारण विचारल्यावर त्याने सांगितले की हा तरुर भविष्यात पोप होणार आहे. हा तरुण म्हणजे फेलिस पेरेसी होता जो 1585 मध्ये पोप झाला. नॉस्त्रॅडेमसच्या अशाच खर्या ठरलेल्या काही भविष्यांविषयीची ही माहिती..... 1. 1550 मध्ये नॉस्त्रॅडेमसने आपले स्वत:चे पंचांग सुरू केले. त्यात ग्रहांची स्थिती, हवामान व पिकांबाबतचे पूर्वानुमान असे. त्यापैकी बहुतांश पूर्वानुमान खरे ठरत असे. त्याला आपल्या मृत्यूचेही पूर्वानुमान होते. त्याने सांगितले होते की त्याच्या मृत्यूनंतर 225 वर्षांनी काही लोक त्याची कबर खोदण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचा तत्काळ मृत्यू होईल. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर 1791 मध्ये तीन माणसांनी त्याची कबर खोदण्याचा प्रयत्न केला, पण तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
2. नॉस्त्रॅडेमसने फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट, जर्मनीचा हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलर, दोन्ही जागतिक महायुद्धे तसेच हिरोशिमा-नाकासाकीवरील अणुहल्ल्याची भविष्यवाणीही केली होती.
3. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबाबतची भविष्यवाणीही नॉस्त्रॅडमेसच्या भविष्यांमध्ये पाहायला मिळते. केनेडी टेक्सासच्या दौर्यावर असताना त्यांची हत्या झाली होती.
4. असे म्हटले जाते की, अमेरिकेत 2001 मधील दहशतवादी हल्ल्याची भविष्यवाणी त्याने केली होती.