बंगळुरू: भारत व ऑस्ट्रेलिया संघात बंगळुरूत सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताचा विश्वविख्यात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने नवा विक्रम नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला केवळ 33 धावांवर अश्विनने बाद करताच अश्विनचा प्रकाश झोतात आला.