इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी ट्विट करत विचारले आहे की पाकिस्तानी चाहते भारत आणि इंग्लंडच्या सामान्यात कोणाला समर्थन देतील? अनेक चाहत्यांनी उत्तर दिले की आम्ही तर भारतालाच समर्थन देणार कारण भारत आमचा शेजारी देश असून भारतीयांमध्ये क्रिकेटप्रती वेगळा जुनून आहे. तसं असे ही नाही की सर्व पाकिस्तानी चाहत्यांनी भारताला समर्थन देण्याची इच्छा व्यक्त केली. काही लोकांचे उत्तर वेगळे होते. जसे नाजिया अफरीदी यांनी इंग्लंड विजयी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तर पाकिस्तान या प्रकारे पोहचेल सेमीफायनलमध्ये
पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध आपले दोन्ही सामने जिंकावे लागतील. सोबतच दुआ करावी लागेल की भारत- न्यूझीलँडचे सोबत होणारे सामन्यात इंग्लंडने पराभूत व्हावे. ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहचला असून न्यूझीलँड आणि भारताचा पोहचणे एका प्रकारे निश्चित आहे. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कठीण लढा असू शकते.