इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 च्या हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. आता या लीगमधील उत्साह हळूहळू वाढत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ या हंगामातील पहिला आयपीएल सामना त्यांच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबई संघ 31 मार्च रोजी त्यांच्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना 31 मार्च 2025 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार. नाणेफेक सामन्याच्या अर्धातासापूर्वी 7वाजता होणार.
आतापर्यंत दोन्ही संघांनी हंगामात प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोघांची कामगिरी वेगळी राहिली आहे. मुंबईने दोन्ही सामने गमावले आहेत. तर कोलकाताने हंगामाची सुरुवात आरसीबीविरुद्ध पराभवाने केली होती. यानंतर, त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवला.
आयपीएलमध्ये आतापर्यंत केकेआर आणि मुंबई यांच्यात 34 सामने झाले आहेत, त्यापैकी पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईने 23 वेळा विजय मिळवला आहे, तर कोलकाता संघाने फक्त 11 सामने जिंकले आहेत.