आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता 19 डिसेंबर रोजी मिनी लिलावात अनेक खेळाडू खरेदी करून सर्व फ्रँचायझी आपला संघ पूर्ण करतील. सर्वप्रथम चेन्नई संघाने आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. चेन्नईने बेन स्टोक्सला वगळले. याबाबत आधीच अटकळ बांधली जात होती. त्याच वेळी, दिल्लीने 11 खेळाडूंना सोडले आणि ही फ्रेंचायझी पुन्हा मेगा लिलावात नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करेल.